देशाच्या सर्व संपत्तीचे राष्ट्रीयीकरण व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:57+5:302021-07-16T04:14:57+5:30
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्त्वज्ञानी बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत ते ...

देशाच्या सर्व संपत्तीचे राष्ट्रीयीकरण व्हावे
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्त्वज्ञानी बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्याख्यानमाला ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, यावेळी ट्रस्टचे सचिव भन्ते पय्यानंद, डॉ. दुष्यंत कटारे, प्रा. देवदत्त सावंत यांची उपस्थिती होती. प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, आजच्या खाजगीकरणाच्या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांचे पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे. त्या ठिकाणी भांडवलदाराचे प्राबल्य निर्माण झाले आहे. आपण सर्वांनी जातविरहित कार्य केले पाहिजे. वर्तमान काळामध्ये बुद्धाच्या विचारांची प्रत्यक्ष कृती केल्यानेच आपल्याला सर्व समस्यांवरील समाधान प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. देवदत्त सावंत, अनिरुद्ध बनसोडे, अरुण कांबळे, डॉ. संजय गवई, प्रज्वल कटारे, सुमित भडके, संयम गवई यांनी परिश्रम घेतले.