अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानांना २ वाजेपर्यंत मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:35+5:302021-06-01T04:15:35+5:30
विवाह सोहळ्यांसाठी संख्येची मर्यादा नियोजित विवाह सोहळे स्वगृही करता येतील. मात्र, त्यासाठी संख्येची मर्यादा असेल. २५ लोकांच्या आणि दोन ...

अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानांना २ वाजेपर्यंत मुभा
विवाह सोहळ्यांसाठी संख्येची मर्यादा
नियोजित विवाह सोहळे स्वगृही करता येतील. मात्र, त्यासाठी संख्येची मर्यादा असेल. २५ लोकांच्या आणि दोन तासांच्या वेळेत विवाह सोहळे उरकावे लागतील.
सरकारी कार्यालयांत २५ टक्के उपस्थिती
सरकारी कार्यालयांत पूर्वी १५ टक्के उपस्थिती होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून, २५ टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहता येईल. २ वाजेनंतर वैद्यकीय सेवा वगळता अन्य आस्थापाने कडकडीत बंद राहतील.
वीकेंड लॉकडाऊन सुरूच राहणार
आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सर्वप्रकारच्या दुकानांना दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी आहे. शनिवार, रविवार मात्र कडक लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा वगळता आठवड्यातील दोन दिवस कडकडीत बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनीही निर्बंधाबाबत माहिती दिली.