आळंदी - पंढरपूर पायी वारी यात्रेत उदगीरचे उमाकांत तपशाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:30+5:302021-07-20T04:15:30+5:30
उदगीर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यंदा केवळ ३०० वारकऱ्यांना माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. यात ...

आळंदी - पंढरपूर पायी वारी यात्रेत उदगीरचे उमाकांत तपशाळे
उदगीर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यंदा केवळ ३०० वारकऱ्यांना माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. यात येथील वारकरी उमाकांत तपशाळे यांचा समावेश आहे. ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी यात्रेत सहभागी झाले आहेत.
येथील वारकरी उमाकांत तपशाळे मागील २७ वर्षांपासून न चुकता आळंदी - पंढरपूर पायी वारी व महिन्याची वारी करतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शासनाने केवळ तीनशे वारकऱ्यांना वारीत सहभागी होण्यास परवानगी दिली. यात उदगीरच्या तपशाळे यांना मान मिळाला. दिंडी क्रमांक १७तून माऊलींच्या रथापुढे ह. भ. प. कृष्णा महाराज धाडगे यांची दिंडी व सोबत ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज, बुलढाणा आणि ह. भ. प. आबा महाराज यांच्यासोबत ते या पायी वारीत सहभागी झाले आहेत. मोजक्याच वारकऱ्यांसोबत तपशाळे यांना हा मान मिळाल्यामुळे उदगीरच्या वारकरी संप्रदायातून आनंद व्यक्त होत आहे.
गेल्या २७ वर्षांपासून आपण आळदी - पंढरपूर पायी वारी व महिन्याची पंढरपूर वारी करत असल्याने पांडुरंगाने बोलावले असल्याचे वारकरी उमाकांत तपशाळे यांनी सांगितले. पांडुरंगांच्या चरणी कोरोनाचे संकट लवकरात लवकर निवळू दे आणि जग कोरोनामुक्त व्हावे, अशी प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.