अहमदपूर-नांदेड रस्त्यावर ट्रक आडवून लाखाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:05+5:302021-05-09T04:20:05+5:30
अहमदपूर ते नांदेड जाणाऱ्या रोडवर ७ मे रोजी पाहटे चारच्या दरम्यान एम एच २६ बीई ८८८९ या क्रमांकाच्या ट्रकला ...

अहमदपूर-नांदेड रस्त्यावर ट्रक आडवून लाखाला लुटले
अहमदपूर ते नांदेड जाणाऱ्या रोडवर ७ मे रोजी पाहटे चारच्या दरम्यान एम एच २६ बीई ८८८९ या क्रमांकाच्या ट्रकला थांबवून चोरट्यांनी चालकाला तसेच साक्षीदाराला काठीने मारहाण केली. धमकी देऊन त्यांच्याजवळील मोबाईल, सोन्याची पेटी, सोन्याचे पान, रोख रक्कम, ट्रकची बॅटरी, ट्रकचे टायर डिस्कसह, दोनशे लिटर डिझेल अंदाजे असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तीन ते चार जणांनी मारहाण केली, असे बळिराम विश्वनाथ मुंडे यांनी अहमदपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अनोळखी तीन ते चार जणांविरुद्ध कलम ३४१, ३९४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक लाकाळ करीत आहेत.