शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लातुरात तपास पथकांच्या हाती बिहारच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे! 

By राजकुमार जोंधळे | Updated: June 28, 2024 08:04 IST

नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी गुजरात, बिहारला का?

राजकुमार जाेंधळे

लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : नीट गुणवाढसंदर्भात लातुरातील आराेपींनी व्हाॅटसॲपवर मागवून घेतलेल्या प्रवेशपत्रांची यादी सध्याला २२ वर पाेहोचली आहे. यातील १४ जणांची ओळख पटली असून, त्यांची चाैकशीही करण्यात आली. काही प्रवेशपत्रे बिहार राज्यातील विद्यार्थ्यांची असल्याची माहिती चाैकशीतून समाेर येत आहे. या विद्यार्थ्यांचे आणि महाराष्ट्रातील आराेपी मुख्याध्यापक पठाण, शिक्षक संजय जाधव यांच्याशी काय ‘कनेक्शन’ आहे. याचीही कसून चाैकशी केली जात आहे.

लातूर, हैदराबाद मार्गाने नीटचे कनेक्शन दिल्लीतील गंगाधरपर्यंत धडकल्याची तपासयंत्रणांना खात्री पटली. महाराष्ट्रातील आराेपींचे दिल्ली, बिहार, उत्तराखंड राज्यातील एजंटांशी काही धाेगेदाेरे लागतात का? याचाही माग पथकांकडून काढला जात आहे. लातुरातील १४ प्रवेशपत्रांपैकी काही प्रवेशपत्रे बिहार राज्यातील विद्यार्थ्यांची आढळल्याचे समाेर आले असून, यातून महाराष्ट्र व बिहारचे नीट कनेक्शन असावे, असा संशय आता बळावत चालला आहे.

नीटमध्ये परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असली तरी काहींनी महाराष्ट्राबाहेर गुजरात, बिहार आणि कर्नाटकातील केंद्र का निवडले, हा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात राजर्षी शाहू महाविद्यालयाचे नीट सेलचे प्रमुख प्रा. दिलीप देशमुख म्हणाले, परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा नसावी, शिवाय परराज्यात विद्यार्थी का जातात याबाबतचे पत्र एनटीएला एप्रिलमध्ये पाठविले होते. 

गृह खात्याने मागवला अहवाल‘नीट’ प्रकरणात लातुरात जि. प. शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि साेलापूरचा जि. प. शिक्षक असलेला संजय जाधव यांना अटक करण्यात आली असून, त्यांची सध्या पाेलिस काेठडीत कसून चाैकशी सुरू आहे. हे प्रकरण गृहमंत्रालयाने गांभीर्याने घेतले असून, चाैकशी अहवाल मागविल्याची माहिती आहे. या अहवालावर वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची नजर आहे

इरण्णाच्या घरास टाळेलातुरातील एका उच्चभ्रू साेसायटीत राहणाऱ्या इरण्णा काेनगलवार (वय ४०, रा. लातूर) याच्या घराला सध्या टाळे आहे. लातुरातून उमरगा येथे ये-जा करणाऱ्या इरण्णाने या साेसायटीत काही वर्षांपूर्वीच घर घेतले असल्याची माहिती मिळाली. लातूर पाेलिसांच्या तावडीतून इरण्णा निसटला असून, त्याच्या मागावर तपास यंत्रणांची विविध पथके आहेत.

टॅग्स :laturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रBiharबिहार