प्रशासनाकडून कौतुकास्पद पाऊल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST2021-04-19T04:17:54+5:302021-04-19T04:17:54+5:30
२७२ जणांच्या चाचणीत १२ पॉझिटिव्ह रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत बार्शी रोडवर विनाकारण घराबाहेर पडलेल्या १६२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...

प्रशासनाकडून कौतुकास्पद पाऊल!
२७२ जणांच्या चाचणीत १२ पॉझिटिव्ह
रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत बार्शी रोडवर विनाकारण घराबाहेर पडलेल्या १६२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर १६२ जणांच्या चाचणीमध्ये आठ पॉझिटिव्ह आढळले. त्यांना पूरणमल लाहोटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
गांधी चौक पोलीस ठाण्यांतर्गत गांधी चौकात मनपा, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने ५० जणांची चाचणी केली. त्यात दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, विनाकारण घराबाहेर पडल्याबद्दल १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३८ जणांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नंदी स्टॉप येथे आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जणांची चाचणी केली. त्यात दोन पॉझिटिव्ह आढळले.