निलंग्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:52+5:302021-01-18T04:17:52+5:30
सोमवारी सकाळी १० वा. येथील आयटीआय महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी १८ टेबलची मांडणी करण्यात आली असून ११ ...

निलंग्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
सोमवारी सकाळी १० वा. येथील आयटीआय महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी १८ टेबलची मांडणी करण्यात आली असून ११ फेऱ्या होणार आहेत. त्यासाठी ९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी व एक कोतवाल अशी नियुक्ती करण्यात आली आहे. होसुर, उस्तुरी, बसपूर, कासार बालकुंदा, सावरी, जाजनुर, वाडीशेडोळ, कासारशिरशी, कोराळी, वळसांगवी, वाक्सा, आनंदवाडी (अबु.), लांबोटा, माळेगाव (जे.), डोंगरगाव (हा.), ढोबळेवाडी/ म्हसोबावाडी, हंद्राळ, टाकळी, बुजरूगवाडी, मुदगड एकोजी, गौर, अंबुलगा (मेन), औराद शहाजानी, बामणी, बडूर, केळगाव, हाडगा, शिरोळ- वांजरवाडा, शिऊर, कोकळगाव, ताडमुगळी, नणंद, हासोरी (बु.), खडक उमरगा, पिरुपटेलवाडी, माळेगाव (क.), हंचनाळ, रामतीर्थ, ताजपूर, सरवडी, तगरखेडा, वांजरवाडा, आंबेवाडी- मसलगा आदी गावांत मतदान झाले आहे. मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली.