२३ लाख ७१ हजारांची जादा बिले; जिल्ह्यातील १४ रुग्णालयांना नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:21+5:302021-06-09T04:24:21+5:30
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नोडल अधिकारी व ऑडिटर यांची नेमणूक केली आहे. त्यांचे दूरध्वनी क्रमांक हॉस्पिटलच्या रिसेप्शन व नोंदणी काउंटरवरील दर्शनी ...

२३ लाख ७१ हजारांची जादा बिले; जिल्ह्यातील १४ रुग्णालयांना नोटीस!
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नोडल अधिकारी व ऑडिटर यांची नेमणूक केली आहे. त्यांचे दूरध्वनी क्रमांक हॉस्पिटलच्या रिसेप्शन व नोंदणी काउंटरवरील दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच काही हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य मित्र नेमण्यात आले आहेत. त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास हॉस्पिटलच्या ऑडिटरकडे संपर्क साधावा, असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे.
रुग्णालयांचेही काही प्रश्न
लेखापरीक्षकांनी केलेल्या अहवालाबाबत संबंधित रुग्णालयांनीही काही अडचणी मांडलेल्या आहेत. या संदर्भात अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, हॉस्पिटलच्या अडचणी सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहेत. ज्या रुग्णालयांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही, त्यांची नावे नंतर जाहीर करून रुग्णांचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयाविरुद्ध कारवाई प्रस्तावित होईल.
एकही त्रुटी नसणारे रुग्णालयही आहेत
जिल्ह्यात एकूण ८५ खासगी कोविड उपचार दवाखाने आहेत. त्यातील जवळपास १२ रुग्णालयांची एकही त्रुटी नाही. १४ रुग्णालयांच्या त्रुटी समोर आल्या आहेत. तर उर्वरित काही रुग्णालयांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे कोविड उपचार काळात उत्तम सेवा देणारे आणि योग्य बिल आकारणारे रुग्णालयेही लातूरमध्ये असल्याचे लेखापरीक्षण करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.