विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी ८०५ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १ हजार ८८३ व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ५६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ९० नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान शनिवारी उपचारादरम्यान, १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १ हजार २८७ रुग्णांवर उपचार सुरु असून, यापैकी ५३५ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०४ टक्क्यांवर पोहचले असून, रुग्ण दुपटीचा कालावधी २६८ दिवसांवर पोहचला आहे. तर मृत्यूदर २.५ टक्के असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
१९० जणांना मिळाली सुटी...
शनिवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १९० जणांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयतील ५, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर २, ग्रामीण रुग्णालय जळकोट १, ग्रामीण रुग्णालय किल्लारी १, एक हजार मुला-मुलींचे वसतीगृह येथील ८, मरशिवणी कोविड सेंटर २, कृषि पी.जी. कॉलेज चाकूर ४, बावची कोविड सेंटर ३, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन ७ तर होमआयसोलेशनमधील १२१ रुग्णांचा समावेश आहे.