जिल्ह्यात आणखी ८८९ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:16+5:302021-05-08T04:20:16+5:30
उपचारादरम्यान मयत झालेल्या ३२ रुग्णांपैकी १४ रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. दोघांना कोरोनासह सहव्याधी होत्या. तर १६ जणांचे ...

जिल्ह्यात आणखी ८८९ रुग्णांची भर
उपचारादरम्यान मयत झालेल्या ३२ रुग्णांपैकी १४ रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. दोघांना कोरोनासह सहव्याधी होत्या. तर १६ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.
प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून सुटी
प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे १२२५ जणांना सुटी देण्यात आली. त्यामध्ये होम आयसोलेशनमधील ८८९, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ११, सामान्य रुग्णालय उदगीर येथील १६, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ६, अहमदपूर ग्रामीण रुग्णालय २, चाकूर ग्रामीण रुग्णालय २, जळकोट ग्रामीण रुग्णालय ५, किल्लारी ग्रामीण रुग्णालय १, कासारशिरसी ग्रामीण रुग्णालय १, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर येथील ४, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ६०, दापका कोविड केअर सेंटरमधील १८, कृषी पीजी कॉलेज येथील ११, समाजकल्याण हॉस्टेल येथील ३५ अशा एकूण १२२५ जणांना प्रकृती ठणठणीत झाल्याने सुटी देण्यात आली.