जिल्ह्यात आणखीन २९९ रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:12+5:302021-05-23T04:19:12+5:30
४२८ रूग्णांना रूग्णालयातून सुटी प्रकृती ठणठणीत झाल्याने ४२८ रूग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील २९४, विलासराव देशमुख ...

जिल्ह्यात आणखीन २९९ रूग्णांची भर
४२८ रूग्णांना रूग्णालयातून सुटी
प्रकृती ठणठणीत झाल्याने ४२८ रूग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील २९४, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १७, सामान्य रूग्णालय उदगीर येथील ७, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २०, ग्रामीण रूग्णालय अहमदपूर येथील ५, चाकूर येथील २, देवणी येथील १, कासारशिरसी येथील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २५, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील २२ अशा एकूण ४२८ जणांनी कोरोनावर मात केली.
मृत्यूचे प्रमाण कायम...
मृत्यूचा दर गेल्या अनेक दिवसांपासून १.८ टक्के आहे. दररोज २५ च्या पुढून रूग्ण मृत्यू पावत आहेत. याबाबत आरोग्य विभाग चिंतेत असून, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के असून, रूग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे, असेही जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.