जिल्ह्यात २६ बाधित रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:32+5:302020-12-31T04:20:32+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत ७५७ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६५५ निगेटिव्ह तर ९ जणांचा ...

जिल्ह्यात २६ बाधित रुग्णांची भर
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत ७५७ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६५५ निगेटिव्ह तर ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ४८६ जणांची रॅपिड ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ४६९ निगेटिव्ह तर १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रयोगशाळेतील चाचणी आणि रॅपिड असे दोन्ही मिळून २६ बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या ३१३ जणांवर उपचार सुरु असून त्यापैकी १५३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्क्यांवर पोहचले असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ६९० दिवसांवर पोहचला आहे. तर मृत्यूदर २.९ टक्क्यांवर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
३२ जणांची कोरोनावर मात...
बुधवारी ३२ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. त्यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, खाजगी रुग्णालय ११ तर होम आयसोलेशनमधील १८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात प्रयोगशाळेतील चाचण्या आणि रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या वाढविण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.