जिल्ह्यात आणखी २१२ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:23+5:302021-05-26T04:20:23+5:30

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाला असून, मंगळवारी २१२ रुग्णांची नव्याने भर पडली आहे, तर उपचारादरम्यान २२ ...

Addition of 212 more patients in the district | जिल्ह्यात आणखी २१२ रुग्णांची भर

जिल्ह्यात आणखी २१२ रुग्णांची भर

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाला असून, मंगळवारी २१२ रुग्णांची नव्याने भर पडली आहे, तर उपचारादरम्यान २२ जणांचा मृत्यू झाला असून, ५२५ जणांनी कोरोनावर मात केली. आता बाधितांचा आलेख ८७ हजार ९०६ वर पोहोचला असून, यातील ८२ हजार ३९७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ३ हजार ४९७ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर आणि गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत २ हजार १२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत ३६० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात ७१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर १ हजार ९०४ जणांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. त्यात १४१ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, दोन्ही चाचण्या मिळून २१२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. उपचारादरम्यान २२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १५ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते, तर ७ जणांचे वय वर्षांपेक्षा कमी होते. सध्या उपचार घेत असलेल्या ३ हजार ४९७ रुग्णांपैकी ३८८ रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत. ३० रुग्ण गंभीर मॅकेनिकल व्हेन्टिलेटरवर आहे, तर १९० रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेन्टिलेटरवर आहेत. ५५० रुग्ण मध्यम लक्षणाची असून, ते ऑक्सिजनवर आहे. २६७ रुग्णांमध्ये मध्यम लक्षणे असून, विनाऑक्सिजनवर आहे. २ हजार ४६० रुग्णांत मात्र सौम्य लक्षणे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले. ३ हजार ४९७ रुग्णांपैकी १ हजार ३२३ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व खासगी रुग्णालयात आहेत, तर २ हजार १७४ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

५२५ जणांना मिळाली सुटी...

प्रकृती ठणठणीत झाल्याने गृहविलगीकरणातील ४३९, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ४, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १७, दापका कोविड केअर सेंटरमधील १५, कृषी पी. जी. कॉलेज, चाकूर येथील ८, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ७ अशा एकूण ५२५ जणांना प्रकृती ठणठणीत झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के आहे.

Web Title: Addition of 212 more patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.