लातूर जिल्ह्यात १८१ बाधित रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:33+5:302021-05-30T04:17:33+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी १ हजार ३१३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १०० जणांचा ...

लातूर जिल्ह्यात १८१ बाधित रुग्णांची भर
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी १ हजार ३१३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १०० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर २ हजार ७१ जणांची रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ८१ बाधित आढळले आहेत. रॅपिड ॲन्टीजन आणि प्रयोगशाळेतील चाचणी असे दोन्ही मिळून १८१ नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. सद्यस्थितीत २ हजार ६१३ रुग्णांवर उपचार सुरु असून, यापैकी १ हजार ५०८ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६८ टक्क्यांवर पोहचले असून, मृत्यूदर २.३ टक्के आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी २६८ दिवसांवर पोहचला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के...
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६८ टक्क्यांवर पोहचले असून, शनिवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ३९० जणांना सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ९, सामान्य रुग्णालय उदगीर १, सु्पर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक ११, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर २, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव ७, ग्रामीण रुग्णालय चाकूर २, उदगीर पशु वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह ५, एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह ५, मरशिवणी कोविड सेंटर २, देवणी कोविड सेंटर ५, कृषि पी.जी. कॉलेज चाकूर ३, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन ८ तर होमआयसोलेशनमधील २७५ जणांचा समावेश आहे.