जिल्ह्यात आणखी १६४३ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:30+5:302021-04-18T04:19:30+5:30
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवारी १ हजार ६४३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता बाधितांचा आलेख ...

जिल्ह्यात आणखी १६४३ रुग्णांची भर
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवारी १ हजार ६४३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता बाधितांचा आलेख ५३ हजार ५६६ वर पोहोचला आहे. यातील ३७ हजार ३०८ बरे होऊन घरी परतले आहेत, तर ८८४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान रविवारी २५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. सद्य:स्थितीत १५ हजार ३७४ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात २ हजार ५८ आरटीपीसीआर ३ हजार १७१ रॅपिड ॲंटिजेन टेस्ट असे एकूण ५ हजार २२९ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात १ हजार ६४३ रुग्ण आढळले आहेत. सद्य:स्थितीत १५ हजार ३७४ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ११ हजार २०५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, ४ हजार १६९ रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत. दरम्यान, प्रकृती ठणठणीत झाल्याने ९३५ जणांना सुटी देण्यात आली.