साप मारून व्हायरल कराल तर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:47+5:302021-07-08T04:14:47+5:30
गत चार दिवसापासून उदगीर येथील एका संशयिताने साप मारून त्याची चित्रफित साेशल मीडियावरून व्हायरल केल्याप्रकरणी लातूर वन विभागाने एकाविराेधात ...

साप मारून व्हायरल कराल तर कारवाई
गत चार दिवसापासून उदगीर येथील एका संशयिताने साप मारून त्याची चित्रफित साेशल मीडियावरून व्हायरल केल्याप्रकरणी लातूर वन विभागाने एकाविराेधात कारवाई केली़ याप्रकरणी सांगली येथील प्राणिमित्र ॲड. बसवराज हाेसगाैडर यांनी व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर संबंधिताचा शाेध घेत तक्रार दाखल केली हाेती़ या तक्रारीवरून एका संशयिताने साप मारून त्याची चित्रफित साेशल मीडियात व्हायरल केली हाेती़ हे चित्रीकरण राज्यासह देशभरात व्हायरल झाले हाेते़ सांगलीतील प्राणिमित्र ॲड. बसवराज हाैसगाैडर यांनी ही पाेस्ट पाहिली़ त्यांनी पीपल्स फाॅर ॲनिमलच्या कार्यकर्त्यांकडून अधिक माहिती घेत संशयिताचे नाव व पत्ता शाेधून काढला, तर ताे उदगीर येथील असल्याचे समजले़ त्यांनी तातडीने लातूर वन विभागाशी संपर्क साधत त्याच्यावर कारवाईसाठी तक्रार दिली़ त्यानुसार वनमाल टी.बी़ वंजे यांनी संशयिताला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली आहे़