बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

By संदीप शिंदे | Updated: January 4, 2023 18:54 IST2023-01-04T18:54:36+5:302023-01-04T18:54:54+5:30

भादा पोलिसांच्या हद्दीत अंदाेरा गावातील घटना

A young man who was walking around with a sword in his hand was arrested | बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

लातूर : शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना भादा पोलिसांच्या हद्दीत अंदाेरा गावातील एक युवक हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने अंधोरी येथे एका तरुणाला तलवारीसह अटक केली असून,भादा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिसांनी सांगितले,औसा तालुक्यातील अंदोरा येथील अक्षय सतीश आंबेकर (२६,रा.अंदोरा ता.औसा) हा तरुण हातात लोखंडी तलवार घेऊन गावात फिरत असल्याचे ३ जानेवारी रोजी निदर्शनास आले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तलवार जप्त केली असून, या तरुणावर भादा पोलिस ठाण्यात कलम ४,२५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे भादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, अटकही करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलंवडे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार शैलेश जाधव,संजय भोसले,पोलिस अंमलदार राजेंद्र टेकाळे,राम गवारे,मोहन सुरवसे,प्रकाश भोसले,प्रदीप चोपणे यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: A young man who was walking around with a sword in his hand was arrested