पैशाच्या कारणावरुन केलेल्या मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Published: September 17, 2022 06:44 PM2022-09-17T18:44:11+5:302022-09-17T18:44:35+5:30

लातुरातील घटनेत चार जणांविराेधात खुनाचा गुन्हा 

A young man died in an assault due to money | पैशाच्या कारणावरुन केलेल्या मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू

पैशाच्या कारणावरुन केलेल्या मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू

Next

लातूर : पैशाच्या आणि माेटारसायकलच्या कारणावरुन करण्यात आलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लातुरातील सुशिला देवी नगरात १५ सप्टेंबर राेजी घडली. याबाबत शिवाजीनर पाेलीस ठाण्यात चार जणांविराेधात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सुनिता हरी साळुंके (वय ५२ रा. साेनखेड ता. निलंगा ह.मु. डिपी राेड, आंबेडकर चाैक, औंध पुणे) यांचा मुलगा किशाेर (वय ३६) लातुरातील सुशिलादेवी नगर येथील आपल्या पाहुण्याच्या घराकडे आला हाेता. दरम्यान, पांडुरंग महादेव जाधव, सिद्धेश्वर जाधव, राहुल जाधव याच्यासह अन्य एकाने संगणमत करुन पैशाच्या कारणावरुन, माेटारसायकलच्या कारणावरुन झटापट झाली. शिवाय गळा दाबून, डाेक्यात मुका मार मारुन गंभीर जखमी केले. यामध्ये मुलगा किशाेर याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात चार जणांविराेधात गुरनं. ३९२ / २०२२ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

आत्या-मामाच्या मुलात झाला वाद...
पुण्यात वास्तव्याला असलेला आत्याचा मुलगा किशाेर हा लातुरात राहणाऱ्या मामाच्या मुलाकडे आला हाेता. दरम्यान, ताे माेटारसायकल घेवून घराबाहेर पडला. पुन्हा ताे घरी परतल्यानंतर त्याच्यासाेबत मामाच्या मुलांनी वाद घातला. याच वादातून आत्या-मामाच्या मुलामध्ये बाचाबाची हाेवून हाणामारी झाली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असे मयताच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: A young man died in an assault due to money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.