ट्रॅक्टरने ऑटाेला उडवले; एक युवक ठार, दोघे गंभीर

By राजकुमार जोंधळे | Published: June 6, 2023 09:04 PM2023-06-06T21:04:25+5:302023-06-06T21:04:39+5:30

उदगीरातील घटना : भाजीपाला विक्रीसाठी जाताना घडला अपघात...

A tractor hit auto; One youth killed, two seriously injured | ट्रॅक्टरने ऑटाेला उडवले; एक युवक ठार, दोघे गंभीर

ट्रॅक्टरने ऑटाेला उडवले; एक युवक ठार, दोघे गंभीर

googlenewsNext


उदगीर(जि. लातूर) : ट्रॅक्टरने ऑटाेला जाेराने उडवल्याची घटना उदगीरातील नगरपालिकेसमाेरील प्रमुख मार्गावर घडली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका सतरा वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. तर दाेघांवर उपचार सुरू आहेत. याबाबत उदगीर शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर येथील नगरपालिकेसमोरील प्रमुख रस्त्यावर मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रॅक्टर चालकाने ऑटोला (एम.एच.२४ ई ५९५६) जोराची धडक दिली. या अपघातात ऑटोचालक नसरुद्दीन जावेद फकीर, ऑटाेतील प्रवासी शोएब पटेल आणि वीरभद्र संतोष पाटील (सर्व रा. रावणगांव, ता. उदगीर) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. जखमी वीरभद्र पाटील (वय १७) या युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव झाला. त्याच्या दोन्ही पायांवरून टॅक्टर गेला असून, त्याला पुढील उपचारांसाठी लातूरला हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याबाबत उदगीर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावाकडून ऑटाेत पहाटे आणला हाेता भाजीपाला...
रावणगाव येथून शेतातील भाजीपाला उदगीर शहरात विक्रीसाठी ऑटाेमधून दाेघांनी आणला हाेता. दरम्यान, उदगीर शहरातील नगरपालिकेसमाेरील प्रमुख रस्त्यावरच ट्रॅक्टरने ऑटाेला जाेराने उडविले. या अपघातात ऑटाेचालकासह अन्य दाेघे गंभीर जखमी झाले. यातील वीरभद्र पाटील या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर रावणगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: A tractor hit auto; One youth killed, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.