थांबलेल्या ट्रकवर ऊसतोड कामगारांचा ट्रक आदळला
By राजकुमार जोंधळे | Updated: March 9, 2024 21:39 IST2024-03-09T21:39:31+5:302024-03-09T21:39:44+5:30
दहा गंभीर : औराद शहाजानी येथील घटना.

थांबलेल्या ट्रकवर ऊसतोड कामगारांचा ट्रक आदळला
लातूर : ट्रक अपघातात दहा जण जखमी झाल्याची घटना रात्री औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील लातूर-जहिराबाद महामार्गावर घडली. यातील जखमींवर औराद शहाजनी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलविण्यात आले.
पाेलिसांनी सांगितले की, औराद शहाजानी येथील लातूर-जहिराबाद महामार्गावर रात्रीच्या वेळी चहासाठी रस्त्यावर चालकाने ट्रक (के.ए. ०१ ए.जी. ५०२६) बेजबाबदारपणे थांबवला. दरम्यान, पाठीमागून ऊसताेड कामगार घेऊन येणारा ट्रक (एम.एच. २४ ए.बी. ५६४०) जाेराने धडकला. या अपघातात करण चव्हाण, उल्हास राठाेड, सुविता राठाेड, श्रीपत चव्हाण, शाेभा चव्हाण, सुनीता पवार, संताेष चव्हाण, राम चव्हाण, बाबू राठाेड हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी औराद शहाजानी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, शारदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसवराज वलांडे यांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांना औराद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून निलंगा येथे हलविण्यात आले.