शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीस अटक
By हरी मोकाशे | Updated: January 21, 2023 18:33 IST2023-01-21T18:32:50+5:302023-01-21T18:33:16+5:30
शहरातील एक विद्यार्थिनी दुपारी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात होती.

शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीस अटक
उदगीर : शाळा सुटल्यानंतर एक विद्यार्थिनी घराकडे जाताना आरोपीने तिचा पाठलाग करून छेड काढली. तसेच तिचा विनयभंग करुन जिवे मागणीची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील एक विद्यार्थिनी गुरुवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात होती. तेव्हा आरोपी अक्षय शंकर शिंदे (रा. उदगीर) याने तिचा पाठलाग केला. तू मला का बोलत नाहीस असे म्हणत विनयभंग करुन तिची छेड काढली. ही घटना घडल्यानंतर पिडित मुलीच्या वडिलांनी आरोपीस विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.