आजीसोबत नातेवाईकांकडे निघालेली अल्पवयीन मुलगी लातूरमधून गायब
By राजकुमार जोंधळे | Updated: September 18, 2022 18:31 IST2022-09-18T18:30:03+5:302022-09-18T18:31:01+5:30
बीडकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत आजी स्थानकातच थांबली. दरम्यान, बस कुठल्या फलाटावर लागते याबाबत विचारणा करते म्हणून गेलेली अल्पवयीन मुलगी परत आलीच नाही.

आजीसोबत नातेवाईकांकडे निघालेली अल्पवयीन मुलगी लातूरमधून गायब
लातूर - आपल्या आजीसोबत नातेवाईकाकडे जाण्यासाठी लातूर येथील बसस्थानकात आलेली अल्पवयीन अचनाक गायब झाल्याची घटना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्रमांक - २ येथे घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील गोपाळ नगर परिसरात राहणारी तक्रारदार आजी ही आपल्या नातीसोबत बीड जिल्ह्यातील केज येथील नातेवाईकांकडे जाण्यासाठी लातुरातील जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्रमांक - २ येथे आली होती.
दरम्यान, बीडकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत आजी स्थानकातच थांबली. दरम्यान, बस कुठल्या फलाटावर लागते याबाबत विचारणा करते म्हणून गेलेली अल्पवयीन मुलगी परत आलीच नाही. काही वेळानंतर आजीने तिचा शोध घेतला असता, ती बसस्थानक परिसरात कोठेही आढळून आली नाही. बसस्थानकातील चौकशी कक्षावरही चौकशी केली मात्र, तेथेही ठावठिकाणा लागला नाही. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अल्पवयीन मुलीचा शोध घेत आहेत.