शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात भररस्त्यात एकावर भयंकर हल्ला; हैवानासारखे अर्धवस्त्र होईपर्यंत मारत राहिले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 00:52 IST

Latur Crime news: लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर एका तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. तो तरुण बेशुद्ध होईपर्यंत हे टोळके त्याला मारहाणर करत होते.

-राजकुमार जोंधळे, लातूरएका तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने कपडे फाडत अर्धवस्त्र होईलपर्यंत जबर मारहाण केली. ही घटना आंबाजोगाई रोडवर मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, गुन्ह्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर ही व्हायरल झाला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बारमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मारेकरी आणि हल्ल्यातील जखमी तरुण हे सर्वजण बसले होते. 

दरम्यान, बारमध्ये त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली असावी. त्यातूनच वाद झाला. थोड्याच वेळात एका तरुणावर भर रस्त्यावरच सहा ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण रत्यावरच काही वेळ निपचित पडला होता. 

गर्दी जमल्यानंतरही करत राहिले मारहाण

त्यानंतरही मारेकऱ्यांकडून त्याला मारहाण करणे सुरुच होते. ही घटना सुरु असताना बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. अनेकांनी त्याचे व्हिडीओ केले. घटनेची माहिती शिवाजीनगर ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत मारेकरी तरुण पसार झाले होते. 

दरम्यान, घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला तातडीने एका वाहनातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलीस पथकांनी चौघांना ताब्यात घेतले

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी वेगवेळ्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी टोळीतील चार जणांच्या मुसक्या आवळल्या. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, उर्वरित मारेकऱ्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

घटनेतील सर्वजण एकाच गटातील

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांची संपर्क साधला असता, घटनेपूर्वीची माहिती समोर आली. मारेकरी आणि जखमी तरुण हे एका बारमध्ये मंगळवारी बसले होते. त्यांच्यामध्ये कुठल्यातरी कारणावरुन बाचाबाची झाली. यातूनची ही घटना घडली असून, याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील जखमी तरुण आणि मारहाण करणारे हे एकाच गटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीViral Videoव्हायरल व्हिडिओPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल