डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून; किनगाव- मोहगाव रस्त्यावरील घटना
By हरी मोकाशे | Updated: April 14, 2023 19:15 IST2023-04-14T19:14:53+5:302023-04-14T19:15:14+5:30
खुनामागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून; किनगाव- मोहगाव रस्त्यावरील घटना
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव- मोहगाव रस्त्यावरील एका वीटभट्टीजवळ ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द किनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय चंद्रकांत सिरसाठ (रा. सिरसाठवाडी, ता. अहमदपूर) असे मयताचे नाव आहे. किनगाव पोलिसांनी सांगितले, किनगाव- मोहगाव रस्त्यावरील मुख्तार शेख यांच्या वीटभट्टीजवळ एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली. त्यावरुन घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर सदरील मयत व्यक्तीसंदर्भात चौकशी केली असता तो धनंजय सिरसाठ असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शैलेश सुरटकर यांच्या फिर्यादीवरुन किनगाव पोलिसांत कलम ३०२ भादविनुसार अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत. खुनामागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.