शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात गोळी झाडून तरुणाची केली हत्या! लातुरात खळबळ, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरु

By राजकुमार जोंधळे | Updated: February 8, 2023 20:17 IST

लातूरमध्ये नांदेड महामार्गावर असलेल्या भातखेडा येथील एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली.  

लातूर : शहरालगत नांदेड महामार्गावर असलेल्या भातखेडा येथील एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, भातखेडा येथील आपल्या आजारी असलेल्या वडिलांसोबत सुरज गोविंदराव मुळे (वय २५) हा सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास झोपी गेला होता. दरम्यान, रात्री अज्ञात मारेकऱ्यांकडून सुरज मुळे याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. यामध्ये सुरजचा मृत्यू झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात डॉक्टरांच्या माहितीवरून प्रारंभी मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अधिक तपासात हा खून असल्याचे समोर आले. अज्ञात मारेकऱ्यांकडून मयत सुरज मुळे याच्या डोक्यावर गोळी झाडण्यात आली असून, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कलम ३०२ भदवी प्रमाणे बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे करत आहेत.

तपासानंतर खरे कारण येईल समोर सुरज मुळे या तरुणाची कोणासोबत भांडणतंटा होता का? पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाला का? मालमत्तेसह इतर कारणांचा शोध पोलिस घेत आहेत. सध्याला कारण समोर आले नसले तरी, तपसानंतर वास्तव कारण समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

पाळत ठेवून आरोपींनी सुरजवर झाडली गोळी अज्ञात मारेकऱ्यांनी सुरज मुळे याच्यावर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली असावी. त्यानंतरच हत्येचा कट रचला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तो गावाकडे मुक्कामी आल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. 

महिन्यात घडल्या चार खुनाच्या घटनालातूर शहरालगत असलेल्या वासनगाव, बोरी, बाभळगाव आणि आता भातखेडा येथे महिनाभरात अत्यंत निर्घृण खून करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत. यातील बोरी नदीपात्रात दगडाने ठेचून खून करत मृतदेह मांजरा नदीपात्रात टाकला होता. त्यातील आरोपी सापडला आहे. वासनगाव  येथेही एका महिलेचा दगडानेच ठेचून खून केल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपी सापडला आहे. मात्र, बाभळगाव येथील खुनाचा अद्याप उलगडा झाला नाही.

 

 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू