शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:05 IST

या टोळीने लातूर जिल्ह्यात तसेच शेजारील बीड, परभणी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

लातूर : बीड जिल्ह्यातील एका गुन्हेगाराच्या टोळीला घातक शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे. टोळीकडून २४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थागुशाचे पोनि. सुधाकर बावकर, सपोनि. सदानंद भुजबळ उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, औसा व भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने २ ते ३ ऑगस्टच्या मध्यरात्री

रिहान मुस्तफा शेख, अन्वर जलालखा पठाण, हाफीज मुमताजुद्दीन शेख (सर्व रा. परळी, जि. बीड) सादिक मोहम्मद यासीन मोहम्मद, फारुख नबी शेख (रा. बीड) या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले होते. तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन तीन आरोपी पसार झाले होते. या आरोपींना पोलिस कोठडी असताना स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, भादा ठाण्याचे सपोनि. महावीर जाधव यांनी अधिक तपास केला असता त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. अधिक तपासासाठी व फरार आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली होती. पोनि. बावकर यांच्या नेतृत्वाखालील तीन पथके या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. दरम्यान स्थागुशाच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे टोळीतील आणखीन एक साथीदार समीर शमशुद्दीन शेख (रा. बीड) यास ५ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा व ८ लाखांच्या कारसह ताब्यात घेण्यात आले आहे.

चार लाखांचे साहित्य ताब्यातया आरोपींनी जिल्ह्यातील विविध ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून चोरलेला, लपवून ठेवलेला विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात सिगारेट, तांदूळ, साबण, तंबाखू, गोडतेल, काजू , बदाम आदी प्रकारचा असून त्याची किंमत ४ लाख आहे.

गुन्ह्यातील वाहन, साहित्य जप्तगुन्हेगारांनी जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, वाढवणा, उदगीर शहर, किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक तर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत चोरीचे तीन असे एकूण ९ गुन्ह्यांची उकल झाली आहे. गुन्ह्यातील वाहन व साहित्य असा एकूण २४ लाख ८० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

विविध जिल्ह्यात चोरीया टोळीने जिल्ह्यात तसेच शेजारील बीड, परभणी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तपास सुरू असून आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. टोळीतील उर्वरित आरोपींच्या शोधासाठी स्थागुशा तसेच भादा ठाण्याची पथके रवाना करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या