शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांना कंपनीचा ८५ लाखांचा गंडा, ३७ जणांना फसवले

By राजकुमार जोंधळे | Updated: August 28, 2022 20:12 IST

३७ शेतकऱ्यांची फसवणूक: अधिक भाव देण्याचे आमिष

लातूर : जिल्ह्यातील एकूण ३७ शेतकऱ्यांना बाजारभावपेक्षा अधिकचा भाव देण्याचे आमिष दाखवत साेयाबीन खरेदीतून एका खाजगी कंपनीने तब्बल ८५ लाखांला गंडविल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी सांगितले, शेतकरी जगदीश नरहरी साेमवंशी (रा. माटेगाव ता. रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

एमआयडीसी परिसरात असलेल्या गाेल्डस्टार अॅग्राे इंडिया लिमिटेड या खाजगी कंपनीकडून साेयाबीन, तूर खरेदी करण्यात येत असल्याची माहिती तक्रारदार शेतकऱ्यास मिळाली. त्यांनी ११ जुलै २०२२ राेजी तक्रारदार आणि त्यांचा शेतकरी मित्र श्रीधर रावसाहेब जाधव यांनी आपले साेयाबीन विक्री केले. त्यामध्ये जगदीश साेमवंशी आणि श्रीधर जाधव यांनीही सोयाबीनची विक्री केली आहे. दरम्यान, बाजार भावापेक्षा अधिकचा भाव देण्याचे सांगितले होते. तर विक्री केलेल्या साेयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांचा भाव देणार असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना एका बॅकेचा धनादेशही देण्यात आला होता. तर अतिक युसूफ शेख यांच्यासह यांच्यासह अन्य दाेघे तक्रारदारांच्या गावामध्ये आले हाेते. जिल्ह्यातील ३७ शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे समाेर आले. चाैकशी केले असता एमआयडीसी परिसरातील गाेदाम बंद हाेते. विविध गावातील अनेक शेतकऱ्यांनी अधिक भाव मिळणार असल्याच्या आमिषाला बळी पडत आपले साेयाबीन विक्री केलेले हाेते. मात्र, पैशासाठी संबंधितांचा शाेध घेतला असता, ते आढळून आले नाहीत. अखेर आपली फसवणूक झाली आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. या कंपनीने एकूण ३७ शेतकऱ्यांना तब्बल ८५ लाख १५ हजार ३४५ रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अतिक युसूफ शेख याच्यासह अन्य दाेघाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक डाके करत आहेत.

फसवणुकीची व्याप्ती वाढेल

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरु केला आहे. अधिकचा भाव देताे म्हणून शेतकऱ्यांना फसवल्याचा प्रकार घडला आहे. या फसवणुकीच्या घटनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. आराेपी ताब्यात घेतल्यानंतरच गुन्ह्याची इतर माहिती हाती लाणार आहे, असे पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले. 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीPoliceपोलिस