शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ८१ हजार अर्ज

By आशपाक पठाण | Updated: July 15, 2024 19:39 IST

जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे; छाननी, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी

लातूर: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तसेच १२ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत ८१ हजार २२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, छाननी आणि ऑनलाईन नोंदणीला गती गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सोमवारी येथे दिल्या आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.

यात प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना गिरी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांची उपस्थिती होती. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

३५ हजार २६६ अर्ज ऑनलाईन...जिल्ह्यात आतापर्यंत ८१ हजार २२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ३५ हजार २६६ अर्ज ऑनलाईन करण्यात आले असून ४५ हजार ९५९ अर्ज ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. योजनेसाठी पात्रतेच्या निकषात करण्यात आलेल्या बदलांबाबत ग्रामीण, शहरी भागात व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, रेशन दुकानदार, तलाठी, कृषि सहायक, महिला बचतगटातील प्रेरिका (सीआरपी) यांच्यामार्फत नाव नोंदणी आणि प्राप्त अर्जांची छाननी व ऑनलाईन करण्याची प्रक्रिया अधिक गतीने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

रास्त भाव दुकानदारांचे सहाय्य घ्या...ग्रामीण व शहरी भागातील अर्ज स्वीकृती केंद्रात प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या यादीचे नियमितपणे चावडी वाचन करावे. या चावडी वाचनाबाबत दवंडीद्वारे नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी. चावडी वाचनात नोंदविण्यात येणाऱ्या आक्षेपांचा अहवाल तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात यावा. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विविध योजनांच्या लाभार्थी महिलांची गावनिहाय यादी तयार करून त्यांची मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेण्यात यावी. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक महिलांच्या नोंदणीसाठी रास्त भाव दुकानदारांचे सहाय्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी नेटके आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख यांनी तालुकानिहाय प्राप्त अर्जांची माहिती दिली.

टॅग्स :laturलातूर