वाढवण्यातील शिबिरात ७९० जणांनी मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:44+5:302021-07-08T04:14:44+5:30
उद्घाटन उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती सदस्य कल्याण पाटील ...

वाढवण्यातील शिबिरात ७९० जणांनी मोफत आरोग्य तपासणी
उद्घाटन उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती सदस्य कल्याण पाटील उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे, शहर कार्याध्यक्ष डॉ. सतीश जाधव, सचिव डॉ. विक्रम माने, डॉ. संतोष गुणाले, डॉ. योगीता, सरपंच नागेश थोंटे, फ्लोरेन्स नर्सिंग स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती तरे, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा ज्योती स्वामी, प्रा. श्याम डावळे आदींची उपस्थिती होती.
या शिबिरात ८६ जणांची ब्लड शुगर तपासण्यात आली. २४ जणांची हिमोग्लोबीन, ७० जणांंचा ब्लड ग्रुप तर ३०० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ३९ जणांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले. संंधिवात, अस्थमा, रक्ताची कमतरता, जुनाट सर्दी, त्वचारोग, स्त्रियांचे आजार, दातांचे आजार अशा एकूण ७९० रुग्णांंची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.
शिबिरासाठी राष्ट्रवादीचे अन्वर हवालदार, विष्णू पाटील,
संतोष सोमासे, नारायण तरवडे, महेबूब ठाणे, अमजत पठाण, शिवाजी चिखले, बालाजी काळे, सुनील खिडसे, रितेश राजमाने, माधव पुंड, परमेश्वर मुंडकर, नरसिंग तरे, प्रान्सी, जया इंगळे, भारती डावरे, वंदना बुसुने यांनी पुढाकार घेतला.