उदगीरच्या बाजारात तुरीला ७२०० रुपयांचा उच्चांकी दर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:52+5:302021-02-10T04:19:52+5:30
यंदा तुरीचे पिक प्रांरभी चांगले होते. मात्र, फुल आणि फळधरणीच्या काळात अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक भागातील तुरीचे पीक ...

उदगीरच्या बाजारात तुरीला ७२०० रुपयांचा उच्चांकी दर !
यंदा तुरीचे पिक प्रांरभी चांगले होते. मात्र, फुल आणि फळधरणीच्या काळात अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक भागातील तुरीचे पीक वाळून गेले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उतारा ५० टक्क्यांपेक्षा कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
२०१४ साली होता उच्चांकी दर...
२०१४ मध्ये तुरीला उच्चांकी दर ४ हजार ५०० रुपयांचा मिळाला होता. गेल्यावर्षी मात्र ५ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा दर तुरीला मिळाला. मागील कांही दिवसांपासून तुरीची आवक वाढत आहे. त्याप्रमाणात दरही वाढत आहेत. त्यातच बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील सोयाबीन विक्री केल्याने आवक कमी होत असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.
मागणी पूर्ण करण्यासाठी वाढीव दराने खरेदी...
यंदा व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्ध नाही. नाफेडने खरेदी केलेली काही तूर लॉकडाऊनच्या काळात विकला आहे. काही स्टॉक त्यांच्याकडेच शिल्लक आहे. बाजारपेठेत तुरीची (डाळवर्गीय धान्याचीही) मागणी वाढलेली आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता वाढीव दराने खरेदी करत आहेत.
शेतमालाच्या दरवाढीची कारणे...
‘नाफेड’कडून तुरीची लॉकडाऊनमध्ये मोठी विक्री व आता विक्री बंद केली आहे. व्यापाऱ्यांकडेही पुरेसा स्टॉक उपलब्ध नाही. बाजारपेठेत तुरीच्या मागणीत वाढ हाेत आहे. तर सध्या बाजारात अत्यल्प आवक सुरु आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने खरेदी
केली जात आहे. तूर न विकलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीचा फायदा होऊ शकतो. हे दर स्थिर राहणार नसून यामध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.
- सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, दालमील असोशिएशन, उदगीर