जाती-पातीची बंधने झुगारून ६४ जोडपी विवाह बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:31+5:302021-02-11T04:21:31+5:30

यांना मिळते मदत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना नव्या नियमानुसार प्रवर्गानुसार अनुदान देण्यात येते. लाभार्थी जोडप्यातील एकजण एससी, एसटी, व्हीजेएनटी ...

64 couples get married without breaking caste barriers | जाती-पातीची बंधने झुगारून ६४ जोडपी विवाह बंधनात

जाती-पातीची बंधने झुगारून ६४ जोडपी विवाह बंधनात

यांना मिळते मदत

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना नव्या नियमानुसार प्रवर्गानुसार अनुदान देण्यात येते. लाभार्थी जोडप्यातील एकजण एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

दोघेही एकाच प्रवर्गातील असतील तर अनुदान मिळत नाही. जोडप्यातील एक जण एससी असेल तर दुसरा दुसऱ्या प्रवर्गातील असायला हवा.

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजारांचे अनुदान मिळते. यात २४ हजार ५०० रुपये रोख तर २५ हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य दिले जाते.

गेल्या दोन वर्षांमध्ये ६४ प्रस्ताव आले होते. शासनाच्या नियम व अटीनुसार प्रतिजोडप्याला ५० हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. यात २५ हजार रुपयांची भांडीकुंडी आणि २४ हजार ५०० रुपयांचे बचतपत्र देण्यात आले. गेल्या वर्षभरात १२ ते १३ प्रस्ताव आले आहेत. त्याची छाननी झाली आहे. - सुनील खमितकर,

समाजकल्याण अधिकारी

Web Title: 64 couples get married without breaking caste barriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.