लातूर जिल्ह्यात ६ पॉझिटिव्ह ; उदगीरमध्ये एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 22:24 IST2020-05-17T22:23:52+5:302020-05-17T22:24:02+5:30
लातूर शहरात पहिला रुग्ण मुंबईहून आलेला

लातूर जिल्ह्यात ६ पॉझिटिव्ह ; उदगीरमध्ये एकाचा मृत्यू
लातूर : मुंबईहून आलेले ३ जण तर उदगीर कोरोना बाधिताच्या संपर्कातील ३ अशा एकूण सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यात लातूर महापालिका हद्दीत पहिल्यांदाच रुग्ण आढळला असून तो मुंबईहून आलेला आहे. तर दुपारी उदगीरमध्ये ६५ वर्षीय मधुमेही, रक्तदाब व न्यूमोनिया असलेल्या एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले, लातुरात मुंबईहून आलेला रुग्ण माळी नगरातील रहिवाशी आहे, मात्र तो घरी गेला नाही. मुंबई येथून थेट रुग्णालयात आलेला आहे. तसेच जळकोट व वडवळ नागनाथ येथील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्णही थेट मुंबई येथून आलेले आहेत. तर उदगीर येथील बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३ जण पॉझिटिव्ह तर ९ जण निगेटिव्ह आले आहेत.