चाटला पैठणीच्या आषाढम सेलमध्ये ५० टक्क्यांपर्यंत सुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:54+5:302021-08-22T04:23:54+5:30

सोलापूर : सोलापूर येथील चाटला पैठणीच्या आषाढम सेलमध्ये लग्नाचा बस्ता बांधण्याची सुवर्णसंधी असून खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली ...

Up to 50% discount in Ashadham cell of Chatla Paithani | चाटला पैठणीच्या आषाढम सेलमध्ये ५० टक्क्यांपर्यंत सुट

चाटला पैठणीच्या आषाढम सेलमध्ये ५० टक्क्यांपर्यंत सुट

सोलापूर : सोलापूर येथील चाटला पैठणीच्या आषाढम सेलमध्ये लग्नाचा बस्ता बांधण्याची सुवर्णसंधी असून खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा आषाढम सेलमध्ये कलात्मक शालू, पैठणी, प्युअर कंचीवरम, कंची ब्रायडल, धर्मावरम, बनारस, फॅन्सी सिल्क, लेटेस्ट वर्क साड्या, सिंथेटीक व प्युअर कॉटन, अहेराच्या साड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या साड्यांच्या खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत भरघोस सूट सुरू आहे. सध्याच्या कोरोना काळात अनिश्चित वातावरणात येणाऱ्या निर्बधामुळे पुढील दिवसाची वाट न बघता आजच पुढील शुभकार्यासाठी आषाढम सेलमधील डिस्काऊंट रेटमध्ये लग्नाच्या बस्त्याची वस्त्रखरेदी करून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा. या ऑफरचा लाभ मर्यादित दिवसांपर्यंतच मिळणार असल्याचे चाटला पैठणीचे लक्ष्मीकांत चाटला, चंद्रकांत चाटला यांनी सांगितले. जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. (वा.प्र.)

Web Title: Up to 50% discount in Ashadham cell of Chatla Paithani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.