‘राजमाता जिजामाता"चे ५ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST2021-09-17T04:24:37+5:302021-09-17T04:24:37+5:30

लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पहिल्यांदा चार सत्रांमध्ये जेईई - मेन्स - २०२१ परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल जाहीर ...

5 students of 'Rajmata Jijamata' | ‘राजमाता जिजामाता"चे ५ विद्यार्थी

‘राजमाता जिजामाता"चे ५ विद्यार्थी

लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे पहिल्यांदा चार सत्रांमध्ये जेईई - मेन्स - २०२१ परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाने या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत यशाची परंपरा कायम राखली असून या महाविद्यालयाचे ५ विद्यार्थी जेईई - ॲडव्हॉन्स्ड् परीक्षेस पात्र ठरले आहेत.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समर्थ अजित पाटील ९१.८० पर्सेंटाईल (ओपन), शिरीषकुमार चंद्रसेन जाधव ८९.४० पर्सेंटाईल (ओबीसी), विनीत फुलचंद काबरा ८९.२८ पर्सेंटाईल (ओपन), कृष्णा राजेंद्र पेन्सलवार ८५.६० पर्सेंटाईल (इडब्ल्यूएस), कृष्णा अजयकुमार बजाज ६६.३५ पर्सेंटाईल (इडब्ल्यूएस) यांचा समावेश आहे. या यशाबद्दल आ. विक्रम काळे, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, संस्थाध्यक्षा के. ए. जायेभाये, संस्था सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, प्रा. के. डी. केंद्रे, अश्विनी केंद्रे, वैशाली केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. बी. बी. खटके, प्रा. एस. आर. धुमाळ, प्रा. एस. एम. जाधव, प्रा. ए. एस. खोत, प्रा. वैशाली पाटील, शिवकांत वाडीकर आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

Web Title: 5 students of 'Rajmata Jijamata'