चाकूर तालुक्यात ४७ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST2021-01-16T04:22:34+5:302021-01-16T04:22:34+5:30

... नळेगाव येथे पोलिसांचे पथसंचलन चाकूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नळेगाव येथे बुधवारी पथसंचलन करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ...

47,000 voters in Chakur taluka | चाकूर तालुक्यात ४७ हजार मतदार

चाकूर तालुक्यात ४७ हजार मतदार

...

नळेगाव येथे पोलिसांचे पथसंचलन

चाकूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नळेगाव येथे बुधवारी पथसंचलन करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपासून बंदोबस्तात मतदान होणार आहे. पथसंचलनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप कामत, पीएसआय नीलम घोरपडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दामोदर सिरसाट, पोलीस नाईक गणेश बुजारे, भागत मामडगे, सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

...

मतदानासाठी वाढवणा येथे यंत्रणा सज्ज

वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील वाढवणा गावासह परिसरातील २२ गावांत आज, शुक्रवारी मतदान होणार आहे. येथील ग्रामपंचायत १७ सदस्यांची आहे. गावात ६८ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ६ वॉर्ड असून, त्याासठी ११ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. जवळपास ७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अरविंद शिंदे व तलाठी आलुरे यांनी दिली. गावात चोख बंदोबस्त राहणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी सांगितले.

Web Title: 47,000 voters in Chakur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.