२ हजार ९५ व्यक्तींच्या चाचण्यांत ४१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:11+5:302021-06-21T04:15:11+5:30
उपचार घेत असलेल्या ३१४ रुग्णांपैकी ५० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ५ रुग्णांना गंभीर मॅकेनिकल व्हेंटिलेटर असून, ३० रुग्ण गंभीर बीआयपीएपी ...

२ हजार ९५ व्यक्तींच्या चाचण्यांत ४१ पॉझिटिव्ह
उपचार घेत असलेल्या ३१४ रुग्णांपैकी ५० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ५ रुग्णांना गंभीर मॅकेनिकल व्हेंटिलेटर असून, ३० रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत, तर ७८ रुग्ण मध्यम लक्षणाची, परंतु ऑक्सिजनवर आहेत. ७१ रुग्णांमध्ये मध्यम लक्षणे असून, विना ऑक्सिजनवर आहेत, तर १३० रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली.
५ हजार ५७८ बेड रिकामे
रुग्णसंख्या घटल्याने सध्या ५ हजार ५७८ बेड रिकामे आहेत, फक्त ३१४ बेडवर रुग्णांची भरती आहे. भरती असलेल्या रुग्णांपैकी ५ रुग्ण मॅकेनिकल व्हेंटिलेटरवर, ३० रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आणि ७८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ११३ रुग्णांना ऑक्सिजन आहे, तर उर्वरित सर्व रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत.
३० जण कोरोनामुक्त
रविवारी उपचारानंतर ३० रुग्णांना सुट्टी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ५, तोंडार पाटी कोविड केअर सेंटरमधील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ६, दापका कोविड केअर सेंटरमधील २, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ९ अशा एकूण ३० जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.