जिवावर उदार होऊन कोरोनाबाधितांची सेवा बजावणाऱ्यांना ४०० रुपयेच दाम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:24+5:302021-05-24T04:18:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे १५० दिवसाला रोजगार ४०० महिन्याचे कंत्राट ३ पोट भरेल एवढे पैसे द्या; ...

जिवावर उदार होऊन कोरोनाबाधितांची सेवा बजावणाऱ्यांना ४०० रुपयेच दाम !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे १५०
दिवसाला रोजगार ४००
महिन्याचे कंत्राट ३
पोट भरेल एवढे पैसे द्या; नोकरीत कायम करा
कोरोना काळात जिवावर उदार होऊन मृत्यूच्या दाढेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाच्या तुलनेत दाम मात्र खूपच कमी मिळत आहे. त्यामुळे किमान पोट भरेल, एवढे तरी पैसे द्यावेत, अशी मागणी आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर घ्यावे. तसेच त्यांचा विमा काढावा, आदी मागण्या कर्मचाऱ्यांमधून होत आहेत.
काय असते काम
कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या कामासोबतच मृतदेहाचे पॅकिंग करणे, मृत रुग्णांच्या नातेवाइकांना माहिती देणे, मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवणे आदी कामे करावी लागत आहेत. तसेच एखाद्या वेळेस बाहेरून औषधीही आणून द्यावी लागत आहेत. कोरोना रुग्णांची सेवा बजावताना पीपीई कीटचा नियमित वापर करावा लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.
कामाचे मोल द्यावे; कर्मचाऱ्यांमधून मागणी
कोरोनाबाधित व्यक्तीपाशी डॉक्टरांशिवाय कोणी जात नाही. त्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यास अधिक भर पडते. मृतदेहाच्या विल्हेवाटीची जबाबदारी पार पाडूनही पुरेसे मानधन मिळत नाही. निवास, भोजनाची व्यवस्थाही नाही.
- वॉर्डबॉय
वॉर्डबॉयला कोविड सेंटरमध्ये सहा तास ड्युटी करावी लागत आहे. कोरोना रुग्ण शिफ्ट करणे, मृतदेह पॅकिंग करणे आदी कामे करावी लागत आहेत. मात्र त्या तुलनेत दिवसाला केवळ ४०० रुपये मिळत आहेत.
- वॉर्डबॉय
कोरोनाचा काळ सुरू असून, आमच्या आरोग्याची कोणीही काळजी घेताना दिसत नाही. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कामाचा ताणही वाढला आहे. अपेक्षित वेतन द्यावे तसेच सेवेत कायम करून घ्यावे.
- वॉर्डबॉय
कोरोना काळात आम्ही नि:स्वार्थपणे सेवा बजावत आहोत. त्यामुळे आमचे विमा कवच काढण्यात यावे तसेच निवासाची, भोजनाची व्यवस्था करावी. मानधनात वाढ करावी. चारशे रुपये हजेरीमध्ये कुटुंब चालविणे अवघड आहे. - वॉर्डबॉय