शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

साईबाबा शुगरला ४० लाखांचा गंडा; ५ ठेकेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: June 10, 2023 19:03 IST

लातूर, बीड, साेलापुरातील ठेकेदारांचा समावेश...

लातूर : जिल्ह्यातील गाेंद्री (ता. औसा) येथे असलेल्या साईबाबा शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस ताेडणी आणि वाहतुकीचा करार केला. मात्र, केलेल्या करारानुसार ताेडणी आणि उसाची वाहतूक न करता तब्बल ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपयांना गंडविल्याची घटना घडली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात विविध जिल्ह्यातील एकूण पाच ठेकेदारांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, साईबाबा शुगर कारखाना गाेंद्री या साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उस ताेडणीबराेबरच वाहतूक करण्यासाठी सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी वेळाेवेळी करार करण्यात आला हाेता. दरम्यान, करारानंतर झालेल्या व्यवहारापाेटी कारखान्याच्या वतीने धनादेश, आरटीजीएस आणि ऑनलाईन पद्धतीन पाच उस ताेडणी, वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांना  एकूण ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपये देण्यात आले. करारामध्ये नमूक करण्यात आल्याप्रमाणे या पाचही ठेकदाराने उस ताेडणी आणि त्याची वाहतूक न करता साखर कारखान्याची फसवणूक केली. 

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी दत्तात्रय सर्जेराव काेकाटे (वय ४२ रा. मजगे नगर, लातूर) यांच्या तक्रारीवरुन फरीदखान अजिजखान पठाण (रा. हैबतपूर ता. उदगीर जि. लातूर), नवनाथ श्रीपती ढवारे (रा. रायगड नगर, अंबाजाेगाई जि. बीड), आबासाहेब दगडू खरात (रा. खरातवाडी ता. पंढरपूर जि. साेलापूर), वाहतूक उसताेड ठेकेदार धुळाप्पा बिराप्पा गावडे (वडदेगाव ता. माेहाेळ जि. साेलापूर) आणि वाहतूक उसताेड ठेकेदार अजय अशाेक राठाेड (रा. बेलगाव तांडा ता. गेवराई जि. बीड) यांच्या विराेधात गुरनं. २४७ / २०२३ कलम ४२०, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती औसा पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक यू.एस. पटवारी यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर