पेन्शन परतीच्या नोटीसीला ३८३ करदात्यांचा ठेंगा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:26+5:302021-05-30T04:17:26+5:30
लातूर तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे ४५ हजार २८८ लाभार्थी आहेत. यापैकी १ हजार ६२६ कर भरणारे शेतकरी ...

पेन्शन परतीच्या नोटीसीला ३८३ करदात्यांचा ठेंगा !
लातूर तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे ४५ हजार २८८ लाभार्थी आहेत. यापैकी १ हजार ६२६ कर भरणारे शेतकरी असल्याचे समाेर आले आहे. केंद्र शासनाच्या धाेरणानुसार कर भरणारे या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यांना आतापर्यंत वितरित केलेले अनुदान परत घ्यावे, अशा सूचना आहेत. त्यानुसार लातूर तहसील कार्यालयाच्यावतीने १ हजार ६२६ करदात्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी १ हजार ४४३ जणांनी आपल्याकडील रक्कम तहसील प्रशासनाकडे जमा केली आहे तर ३८३ करदात्यांनी नोटिसीला ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे.
योजनेचे तालुक्यातील लाभार्थी - ४५,२८८
कर भरणारे शेतकरी संख्या - १,६२६
रक्कम परत करणारे शेतकरी - १,२४३
रक्कम भरणे बाकी असलेले शेतकरी - ३८३
३८३ जणांकडील वसुली प्रलंबितच...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रथमत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचे कवच भेटत होते. यानंतर याची व्याप्ती वाढविण्यात आली. यामूळे तालुक्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.
लातूर तालूक्यात ४५ हजार २८८ खातेदार आहेत. यापैकी १ हजार ६२६ कर भरणारे शेतकरी आहे. शासनाच्या निर्देशानुसार या कर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून योजनेचे उचललेले अनुदान जमा केले जात आहे.
प्रारंभी तहसील प्रशासनाच्यावतीने संबधितांंना नोटीस पाठविली जात असून, रक्कम वसूल केली जात आहे. आतापर्यंत १ हजार २४३ करदात्यांकडून रक्कम वसूल करण्यात आली असल्याचे लातूर तहसील कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.
काही शेतकरी लाभापासून वंचित...
लातूर तालुक्यातील १ हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. परिणामी, सदरील शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. यातील बहुतांश जणांच्या आधार आणि इतर तांत्रिक अडचणींचा समावेश आहे. तर वंचित असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तहसील प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.
लातूर तालूक्यात ४५ हजार २८८ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. कर भरणारे १ हजार ६२६ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी १ हजार २४३ जणांनी त्यांच्याकडील रकमेचा भरणा केला आहे. दरम्यान, ३८३ जणांकडे निधी शिल्लक आहे. वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे लातूर तहसील प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.