३४८ अल्पवयीन मुली झाल्या गायब, पाेलिसांकडून लागला ३०५ मुलींचा शाेध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:12+5:302021-07-28T04:21:12+5:30
साेशल मीडियावर आता प्रत्येकांना सहज व्यक्त हाेता येत आहे. आता या साधनांचा वापर अल्पवयीन मुला-मुलींकडूनही माेठ्या प्रमाणावर केला जात ...

३४८ अल्पवयीन मुली झाल्या गायब, पाेलिसांकडून लागला ३०५ मुलींचा शाेध !
साेशल मीडियावर आता प्रत्येकांना सहज व्यक्त हाेता येत आहे. आता या साधनांचा वापर अल्पवयीन मुला-मुलींकडूनही माेठ्या प्रमाणावर केला जात आ हे. वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी अतिशय धाेक्याचे ठरत आहे. पूर्वी व्यक्त हाेण्यासाठी साधनांचा अभाव हाेता. आता साेशल मीडियामुळे सहज साधन उपलब्ध झाले आहे. यातूनच चॅटिंगसारखे प्रकार घडत आहेत. थेट संवादाचे माध्यम आणि त्यातून आकर्षण वाढत असल्याने अल्पवयीन मुली आमिषाला बळी पडत आहेत.
अल्पवयीन मुली चुकतात कुठे...
प्रकरण - १
शारीरिक आकर्षणातून जवळीकता वाढते. पुढे प्रेम समजून अल्पवयीन मुली भाळतात. त्यांच्या या भावनिकतेचा फायदा घेत आमिष दाखविले जाते. यातूनच त्यांची फसवणूक हाेते. ताेपर्यंत वेळ हातून गेलेली असते.
प्रकरण - २
साेशल मीडियातून प्रारंभी मैत्री...त्यातून पुढे जवळीकता आणि प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. घरच्यांना पुसटशीही कल्पना न देताही पळून जाण्याचे प्रकार घडतात. यातूनच वेळ निघून गेल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे मुलींच्या लक्षात येते.
प्रकरण - ३
अल्पवयीन मुलींच्या भावनेला हात घालत त्यांची हळुवारपणे फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी साेशल मीडियाचा वापर हाेत आहे. चॅटिंग, मैत्री आणि पळून जाण्याची प्रक्रिया घडते. कुटुंबीयांचा विश्वास गमावलेला असताे. मग वास्तवाची जाणीव झाली की, मग पर्यायही हाती राहत नाही. यातून पळवून नेल्याचा आराेप मुलावर केला जाताे.
मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून त्यांच्याशी मैत्री करा...
१ आई-वडील आपापल्या कामात व्यस्त असतात, यामुळे किशाेरवयीन मुला-मुलींची भावना समजून घ्यायला वेळ नसताे. त्यातूनच एकाकीपणा वाढताे आणि चुका हाेतात.
२ मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी घरात जवळचा काेणी वाटत नाही. मग मुले-मुली मित्र-मैत्रिणींचा आधार घेतात. यातून भावनिक जवळीकता वाढत जाते. शारीरिक बदलाने आकर्षणामध्ये भर पडते.