कोविड सेंटरच्या विद्युतीकऱणासाठी ३२ लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:32+5:302021-06-01T04:15:32+5:30
शिरूर अनंतपाळ येथे ७ वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली. साडेचार कोटी खर्चून ग्रामीण रुग्णालयासाठी इमारती बांधण्यात आली; परंतु ...

कोविड सेंटरच्या विद्युतीकऱणासाठी ३२ लाख मंजूर
शिरूर अनंतपाळ येथे ७ वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली. साडेचार कोटी खर्चून ग्रामीण रुग्णालयासाठी इमारती बांधण्यात आली; परंतु किरकोळ कामे राहिल्याने ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. शासनाने कोट्यवधीचा खर्च करूनही त्याचा सर्वसामान्यांना लाभ होत नव्हता.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील- निलंगेकर यांनी येथील कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेऊन तातडीने कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना केल्या. कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त ५० खाटा, तर साध्या ५० खाटांची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात २४ तास विद्युत पुरवठा असणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन व अर्थ समितीकडून ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भाजपाचे अरविंद पाटील-निलंगेकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन नुकतीच विद्युतीकरणाची नुकतीच पाहणी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष संतोष शेटे, ईश्वर आवाळे, डॉ. देवंगरे, महावितरणचे अभियंता जोंधळे आदींची उपस्थिती होती.
नगरपंचायतीकडून पाण्याची सोय...
ग्रामीण रुग्णालयात २४ तास पाणीपुरवठा व्हावा म्हणून येथील नगरपंचायतीस सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नगरपंचायतीने नवीन विद्युत पंप बसवून पाणीपुरवठा सुरू केला आहे. ग्रामीण रुग्णालयातील दाखल आंतर, बाह्य रुग्णांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून आनंदवाडी ग्रामपंचायतीस आरओ प्लांट बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.