२७ ग्रामपंचायतींची दहा फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:34+5:302021-01-18T04:17:34+5:30

रेणापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींपैकी फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने २७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यात १५ हजार ८३४ पुरुष व ...

27 Gram Panchayats will be counted in ten rounds | २७ ग्रामपंचायतींची दहा फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

२७ ग्रामपंचायतींची दहा फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

रेणापूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींपैकी फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने २७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यात १५ हजार ८३४ पुरुष व १३ हजार ९७९ महिला अशा एकूण २९ हजार ८१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८२ प्रभागांतून २०५ सदस्यांच्या निवडीसाठी ४६० उमेदवार रिंगणात होतेे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार असून, ती १० टेबलांवर व १० फेऱ्यांमध्ये होणार आहे.

या मतमोजणीसाठी ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १० फेऱ्यांत येथील तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर मतमोजणी होणार आहे. मतमोजणी ठिकाणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेशासाठी तहसीलदारांच्या केबीनच्या जवळील गेटमधून प्रवेश करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर प्रतिनिधी व उमेदवारांना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार राहुल पाटील यांनी दिली.

खरोळ्यापासून होणार मतमोजणीस सुरुवात...

पहिल्या फेरीमध्ये मोठी ग्रामपंचायत असलेल्या खरोळ्याची प्रथम मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये मोहगाव, सिंधगाव, दिवेगाव, तिसऱ्या फेरीमध्ये फरदपूर, माकेगाव, भंडारवाडी, चौथ्या फेरीमध्ये तत्तापूर, पळशी, आंदलगाव, पाचव्या फेरीमध्ये तळणी, खलंग्री ,व्हटी सायगाव, सहाव्या फेरीत आनंदवाडी, कुंभारी, मुसळेवाडी, सातव्या फेरीत वाला, गव्हाण, कुंभारवाडी, आठव्या फेरीत दवणगाव, वंजारवाडी, सारोळा, नवव्या फेरीत मोरवड, खानापूर, बिटरगाव, तर शेवटच्या दहाव्या फेरीमध्ये बावची व पाथरवाडी येथील मतमोजणी होणार आहे.

Web Title: 27 Gram Panchayats will be counted in ten rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.