२,६३९ शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:23+5:302021-07-29T04:21:23+5:30
... संकल्प फाउंडेशनतर्फे आरोग्य केंद्रास खुर्च्या गंगापूर : येथील आरोग्य केंद्र अंतर्गत आशा कार्यकर्तींना टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, मास्क, ...

२,६३९ शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
...
संकल्प फाउंडेशनतर्फे आरोग्य केंद्रास खुर्च्या
गंगापूर : येथील आरोग्य केंद्र अंतर्गत आशा कार्यकर्तींना टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, मास्क, छत्री, बॅग अशा जीवनावश्यक साहित्याचे आणि दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्यांचे वाटप संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी सरपंच बाबूराव खंदाडे, ॲड. मनोहरराव गोमारे, डॉ. रेखा रमण रेड्डी, डॉ. रमण रेड्डी, डॉ. आय.सी. कोळ्ळे, डॉ. पी.पी. इगे, माजी सरपंच मनोज गोमारे, नवनाथ कवितके, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रा. महादेव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
...
मुरुड येथे जलकुंभ कामाचे भूमिपूजन
मुरुड : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मांजरा प्रकल्पातून मुरुड गावास कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे १८ लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे भूमिपूजन आ. विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बी.एन. डोंगरे, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. अंकुश नाडे, दीपक पटाडे, चेअरमन वैजनाथ नाडे, गौतम लांडगे, पप्पू शिंदे, प्रकाश अचलारे, प्रभाकर पाटील, अक्षय चव्हाण, राहुल टिळक आदी उपस्थित होते.