१२ लाल परीच्या २४ फेऱ्या, ४५ हजार जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST2021-05-21T04:21:01+5:302021-05-21T04:21:01+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग एप्रिलपासून उदगीर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक ...

१२ लाल परीच्या २४ फेऱ्या, ४५ हजार जमा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग एप्रिलपासून उदगीर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले. तसेच लॉकडाऊन करण्यात आले. ते अजूनही सुरूच आहे. या दीड महिन्यात राज्य परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. सध्या नियमांत काही शिथिलता देण्यात येऊन जीवनावश्यक वस्तूंसह अन्य काही दुकाने सुरू करण्यात आली आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून ५० टक्के भारमानाच्या अटीवर सोमवारपासून उदगीरातून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. उदगीर आगारातील बुधवारी दिवसभर १२ बसेस धावल्या. लातूरला ६, अहमदपूरला ६ अशा बसेस धावल्या. दिवसभरात या बसेसमधून २४ फेऱ्यांद्वारे १ हजार ५०५ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून उदगीर आगारास ४५ हजार रुपये जमा झाले.
सोमवार व मंगळवारी काही अंशी अशीच परिस्थिती होती. कोरोनाच्या धास्तीने प्रवासी बाहेर पडण्यास तयार नाहीत. ज्यांना अत्यावश्यक काम होते, ते प्रवासी बसस्थानकावर आले होते. बसेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी होईल, असा अंदाज होता. परंतु ५० टक्के प्रवाशांची संख्या होण्यासाठी एक-एक तास बस थांबून प्रवाशांची प्रतीक्षा करीत आहेत, असे आगारप्रमुख यशवंतराव कानतोडे यांनी सांगितले.