१ हजार ५९९ चाचण्यांमध्ये आढळले २४ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:07+5:302021-07-12T04:14:07+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी ४७३ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...

१ हजार ५९९ चाचण्यांमध्ये आढळले २४ बाधित रुग्ण
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी ४७३ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ११२६ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यातही १२ बाधित आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून २४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सद्यस्थितीत ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २३ रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. ६ व्हेंटिलेटरवर असून, ३३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. १२ रुग्ण मध्यम लक्षणांचे परंतु विनाऑक्सिजनवर आहेत आणि ३५ रुग्ण सैम्य लक्षणाचे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने घटत असून, तीन तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात शिरूर आनंतपाळ, देवणी आणि जळकोट तालुक्यांचा समावेश आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला असून, तो ६१० दिवसांवर गेला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेटही गेल्या महिनाभरापासून दोन टक्क्यांच्या खाली आहे. यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे अनुपालन करावे. नियमित मास्क वापरावा. सुरक्षित अंतर ठेवावे. हात वारंवार धुवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.