२२ बसस्थानकांना अवकळा अन् प्रवाशांची परवड सुरूच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST2020-12-27T04:15:22+5:302020-12-27T04:15:22+5:30
लातूर विभागात २२ बसस्थानकांची उभारणी करण्यात आली. लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकास मरणकळाच प्राप्त झाली असून, स्वच्छतेचा अभाव आहे. शाैचालय, ...

२२ बसस्थानकांना अवकळा अन् प्रवाशांची परवड सुरूच !
लातूर विभागात २२ बसस्थानकांची उभारणी करण्यात आली. लातुरातील मध्यवर्ती बसस्थानकास मरणकळाच प्राप्त झाली असून, स्वच्छतेचा अभाव आहे. शाैचालय, पाण्याचीही व्यवस्था नाही. लातूर शहर, जुने रेल्वेस्थानक, अंबाजाेगाई राेड लातूर, अहमदपूर, जळकाेट, उदगीर, देवणी बु., निलंगा, औसा, शिरुर ताजबंद, लाजमना, औराद शहाजानी, शिरुर अनंतपाळ, हाळी-हंडरगुळी, कासार सिरसी, नळेगाव, किनगाव, तांदुळजा, चाकूर, पानगाव, रेणापूर आदी बसस्थानकांची दुरवस्था झाली असून, काही बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. परिणामी, शहरी आणि ग्रामीण प्रवाशांची हेळसांड हाेत आहे. अनेक बसस्थानकांत पिण्याचे शुद्ध पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना आपली तहान विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. ग्रामीण भागातील बसस्थानकात असलेले डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. शाैचालयाचीही पडझड झाली आहे. काही ठिकाणी माेकाटा प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास्त सहन करावा लागत आहे. याकडे एस.टी. महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आराेप प्रवाशांतून केला जात आहे.
बहुतांश शाैचालयांची दुरवस्था; प्रवासी झाले त्रस्त
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या बसस्थानकांतील शाैचालयांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे.
परिणामी, अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर काही ठिकाणी काटेरी झुडपांनी वेढा घातला आहे.
पाण्याअभावी अनेक ठिकाणचे शाैचालय बंदावस्थेत आहेत. अनेक ठिकाणी दारे, खिडक्या आणि पत्रेही गायब झाले आहेत.
हाळी हंडरगुळी, शिरुर ताजबंद, किनगाव, औराद शहाजानी, कासार सिरसी, रेणापूर येथील शाैचालयांचीही दुरवस्था झाली आहे.