२ हजार चाचण्यांत आढळले ४८ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:28+5:302021-06-28T04:15:28+5:30
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, रविवारी २ हजार १९ व्यक्तींच्या केलेल्या चाचणीतून ४८ बाधित रुग्णांची भर ...

२ हजार चाचण्यांत आढळले ४८ बाधित
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, रविवारी २ हजार १९ व्यक्तींच्या केलेल्या चाचणीतून ४८ बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आलेख ९० हजार ४५७वर पोहोचला असून, आतापर्यंत ८७ हजार ८११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २४५ रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाने आतापर्यंत २,४०१ जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, रविवारी उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी ६६० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर १,३५९ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही चाचण्या मिळून ४८ बाधित रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या २४५ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर तसेच रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के असून, मृत्यूदर २.६ तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसांवर पोहोचला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.
४२ जणांची कोरोनावर मात
रविवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ४२ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाकडून सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ९, एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह १२ नंबर पाटी येथील ११, शासकीय निवासी शाळा, औसा ६, दापका कोविड केअर सेंटर ३, तर खासगी रुग्णालयातील ७ रुग्णांचा समावेश आहे.