शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

२ हजाराच्या लाचप्रकरणी, तलाठ्यास पाेलिस काेठडी; लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: August 5, 2023 07:07 IST

याप्रकरणात त्याला लातूरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

लातूर : प्रकल्पगस्त प्रमाणपत्र तक्रारदाराच्या नावाने करून देण्याच्या कामासाठी माेबदला म्हणून, दाेन हजारांची लाच घेणाऱ्या एका तलाठ्याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात रंगेहाथ पकडले. याप्रकरणात त्याला लातूरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

एसीबीच्या सुत्रांनी सांगितले, तलाठी केरबा गाेविंदराव शिंदे (वय ४८, रा. प्रकाशनगर, लातूर) हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागात कार्यरत असून, तक्रारदाराच्या चुलत बहिणीच्या नावावर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे. ते आजीच्या शपथपत्राच्या आधारे तक्रारदाराच्या नवाने करून देण्याच्या कामासाठी तलाठी शिंदे याने प्रारंभी पाच हजारांची लाच मागितली. अखेर तडजाेडीअंती दाेन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सापळा लावला. यावेळी दाेन हजारांची लाच घेताना त्यास रंगेहाथ पकडले.

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे. अशी माहिती लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी