तपसे चिंचोली येथे २०० जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:38+5:302021-05-27T04:21:38+5:30

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली हे जवळपास ४ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरणासाठी ६ किमी दूर ...

200 people vaccinated at Tapase Chincholi | तपसे चिंचोली येथे २०० जणांना लस

तपसे चिंचोली येथे २०० जणांना लस

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली हे जवळपास ४ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरणासाठी ६ किमी दूर असलेल्या लामजना येथे यावे लागत होते. लॉकडाऊनमुळे वाहनाची सुविधा नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यामुळे गावात लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे आरोग्य विभागाकडून २०० डोस उपलब्ध करुन देण्यात आले.

गावातील सुशिलाबाई त्रिंबकराव पाटील विद्यालयात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पेंढारकर, पवार, मुसांडे, अवचारे, प्रेमिला लादे, आरोग्य सेवक वीरभद्र हासुरे, पंडित यादव, आशा स्वयंसेविका जनाबाई वाघमारे, सुवर्णा काळे, अंगणवाडी कार्यकर्ती संपता नेटके, छाया कांबळे, कालिंदा वडगावे, लक्ष्मी कलशेट्टी, कोमल नेटके, जयश्री यादव आदींनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. लसीकरणासाठी ग्रामसेवक विजयकुमार जोशी, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, प्रशांत नेटके, सरपंच विश्वंभर सुरवसे, उपसरपंच युवराज यादव, ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: 200 people vaccinated at Tapase Chincholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.