बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणांत २० टक्के बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:15+5:302021-06-28T04:15:15+5:30
हरंगुळ (बु.) : बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणांत २० टक्के बचत होते. अतिवृष्टी झाली तर जास्तीचे पाणी सरीतून निचरा ...

बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणांत २० टक्के बचत
हरंगुळ (बु.) : बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणांत २० टक्के बचत होते. अतिवृष्टी झाली तर जास्तीचे पाणी सरीतून निचरा होते. पावसाचा खंड पडला तर पीक तग धरून राहते. तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. परिणामी, उत्पादनात वाढ होते. त्यामुळे रुंद वरंबा सरी पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी येथे केले.
लातूर तालुक्यातील हरंगुळ (खु.) येथे कृषी विभागाच्यावतीने कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत बीबीएफ पेरणीचा प्रारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, महेश क्षीरसागर, सरपंच दादाराव पवार, सचिन बावगे, पल्लवी बायस ठाकूर यांची उपस्थिती होती.
हरंगुळ (खु.) शिवारात पाचशे एकरवर बीबीएफ पेरणी झाल्यास ६ हजार किलो बियाणांत बचत होईल. उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा वाढविण्याच्यादृष्टीने बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे यावेळी दत्तात्रय गावसाने म्हणाले.
कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्य शिवाजी झुंजे, मनोहर झुंजे, अरुण पाटील, सिद्धेश्वर झुंजे, मनोहर भुजबळ, विनायक झुंजे, अंतराम बिडवे, श्रीमंत झुंजे, गणपती होळकर, विवेक झुंजे, नीळकंठ झुंजे, विठ्ठल भंडे, संगमेश्वर पाटील, अशोक पवार, विनोद पाटील, शिवहार पाटील, वैभव पवार, आमिर शेख, विक्रम पाटील, शरद मसलकर, महादेव बिडवे यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन
कृषी विभागाच्यावतीने कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रतिभा खडके, पल्लवी बायस ठाकूर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले.